बातमी24तास
(प्रतिनिधी,अभिजीत सोनवळे) राजगुरुनगर शहरातील आशानंद रेसिडेन्सी मधील,महाराष्ट्र बुलेटीन न्यूजच्या या वेब पोर्टलच्या माध्यमातून, स्थानिक रहिवाश्यांचे पाण्याच्या प्रश्नाची बातमी महाराष्ट्र बुलेटने प्रसिद्ध केली होती,त्यानंतर राज्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी, बातमीची दखल घेत अधिकाऱ्यांना या पाणी प्रश्नाबाबत संबधीत अधिकाऱ्यांना लक्ष देण्याच्या सूचना केल्या ,याबाबत बातमी महाराष्ट्र बुलेटिन लावली होती. परंतु त्यानंतर सदर बांधकाम व्यवसायकाने रविवार दिनांक २२/०९/२०२४ रोजी पाण्याबद्दल मीटिंग सोसायटीच्या माध्यमातून लावण्यात आली होती, आणि त्या ठिकाणी सर्व महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी बांधकाम व्यवसायिक आनंद तांबे हे मिटिंगला आले असताना त्यांनी पहिल्या जुन्या बातम्याचा राग मनात धरून या मिटिंग ला हजर असणारे महाराष्ट्र बुलेटीन न्यूजचे संपादक अनिकेत गोरे यांच्या अंगावर धावून जात अनिकेत गोरे यांना तुझ्या ग*****दम असेल तर लाव ही बातमी,अशी धमकी पत्रकाराला सर्व सोसायटीच्या सभासदांनासमोर दिली .
दरम्यान, गोरे हे सदर सोसायटी मध्ये राहवयास आहेत. गोरे,समाजात एक पत्रकार म्हणून वावरत असताना, शिवीगाळ करून त्यानंतर बिल्डर तिथून पळून गेला, प्रशासन कधी यांच्यावरत कायदा बंधनकारक करणार आहे,बिल्डर ग्राहकांसोबत फसवणूक करून देखील, प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. आमदार, खासदार मी खिशात घेऊन फिरतो अशा भाषेत सभासदांना दमदाटी करून सभासदांवर दबाव टाकला जातो.या ठिकाणी बिल्डर लोक, सोसायटी बांधून निघून जातात.उलट तुम्हीच नगरपरिषदला जाऊन पाणी घ्या, तुम्ही तुमची सोय करा, मी पाण्याची सोय फक्त माझ्या बांधकामासाठी आणि बांधकाम कामगारांसाठी केलेली आहे. असे संबंधिता कडून बोलले जाते. आमच्याकडून ७५०₹ प्रति महिना पाणी घ्यावे लागेल, अशी दादागिरी या बिल्डरची आहे. त्यानंतर संपूर्ण सोसायटीचे सांडपाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे, शासनाने ताबडतोब याची दखल घेऊन,त्यावर तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी गोरे यांनी केली आहे.