एकादशी निमित्त आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट इंद्रायणी आरतीस महिला भाविकांचा प्रतिसाद

Share This News

बातमी 24तास

आळंदी ( आरीफ भाई शेख) : येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते.

आळंदी ग्रामस्थ व महिला भाविकांची इंद्रायणी आरतीस मोठी गर्दी झाली होती. आळंदी मंदिरात भाविकांनी परिवर्तिनी एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आल्याचे आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, कीर्तन, रात्री धुपारती, शेजारती, हरिजागर झाला.

श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस देखील गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे आदींनी बंदोबस्ताचे सुरळीत, सुरक्षिततेसाठी नियोजन केले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून राहत मिळाली. आळंदी पोलिसांनी रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग केलेल्या गाडयांना जॅमर लावून प्रभावी कारवाई करण्यात आली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरतीतीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी सांगितले. यावेळी लता वर्तुळे, श्वेता भागवत, चारुशीला पोटफोडे, शीला वारे, रुक्मिणी कदम, शालन होणावळे, अनिता शिंदे, शैला तापकीर, राणी वाघ, पुष्पा लेडगर, मंदा मेदगे, पार्वती गव्हाणे, लीला थोरवे, माजी नगरसेविका मालनताई घुंडरे, सुरेखा कुऱ्हाडे, मोहिनी माळवे, उज्वला जुमाले, शोभा फाजगे, शोभा कुलकर्णी, सुनिता माने, वच्छला दाभाडे, रेखा मोरे, विद्या आढाव, मंगल वाघमारे, संगीता कांबळे, राजकन्या सुडे, विमल मुसळे, वैष्णवी इंगळे, नजमा इनामदार आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त आणि आळंदी शहर प्लास्टिक मुक्त होण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन आळंदी शहर पर्यावरण संवर्धन संतीचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले आहे. प्लास्टिक पिशव्या न वापरता कागदी आणि कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हजेरी मारुती मंदिरात नित्यनैमित्त आरती उदय काळे यांचे मार्गदर्शनात हरिनाम गजरात झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy