बातमी24तास (वृत्त सेवा)
चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री. अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजित योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी वैचारिक व्याख्यान्मालेमध्ये मालपाणी उद्योगाचे संचालक मा. डॉ. संजय मालपाणी यांनी श्रीमदभागवतगीतेचे विविध दाखले देत “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” याविषयासंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्यांनी आपल्या व्याख्यानातून गीतेचा मानवी जीवनातील भावार्थ, आणि श्रवण हे पहिले महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. हे पायाभूत कौशल्य आकलनाशी संबंधित आहे. श्रवण हा संपूर्ण ज्ञान प्रक्रियेतील पायाभूत घटक आहे. श्रवण चांगले असेल तरच भाषा आत्मसात करता येते. भाषण व संभाषण या पुढील प्रक्रिया येऊ शकतात. ऐकणे आणि श्रवण या दोन क्रियांमध्ये मूलभूत फरक आहे, तसेच श्वसन संस्था सुधारल्याने प्राणवायूचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊन कामातला उत्साह वाढतो आणि थकवा जाणवत नाही. म्हणजेच व्यक्तीची कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिबंधक शक्ती वाढून प्रसन्नता वाढते. यासंबंधी त्यांनी मोलाचे दाखले देत विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी चाकण शिक्षण मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्री. मोतीलालजी संकला, विश्वस्त सचिव डॉ. अविनाश अरगडे, माजी प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे, व्याख्यानमालेचे प्रायोजक श्री. अभिमन्यू शेलार, प्राचार्य डॉ. राजेश लाटणे, नवोन्मेष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पिंगळे मॅडम, श्री. ज्ञानेश्वर शेलार, श्री. संतोष मांडेकर, श्री. वैभव गांधी तसेच शेतकरी संघटनेचे नेते, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, चाकण ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी मुंगसे, प्रास्ताविक डॉ. शिवाजी एंडाईत, स्वागत व परिचय प्रा. रणजित काळण व आभार डॉ. उमेश भोकसे यांनी मानले.