8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा- खेड कॉरिडोरला मंजुरी! तब्बल 7 हजार 827 कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प.

Share This News

बातमी24तास, (वृत्त सेवा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने बहुप्रतिक्षित “8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा- खेड कॉरिडोर”ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

तब्बल 7 हजार 827 कोटी रुपये किमतीच्या 32 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम यानिमित्ताने मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे.

नाशिकफाटातेखेडकॉरिडोर पिंपरी- चिंचवडकरांसाठी Good News |

नाशिक फाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडोरला केंद्र सरकारची मंजुरी मंजुरी!- तब्बल 7 हजार 827 कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प – नाशिक फाटा ते खेड अंतर अवघ्या काही मिनिटात होणार पार – तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने बहुप्रतिक्षित “8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा- खेड कॉरिडोर”ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तब्बल 7 हजार 827 कोटी रुपये किमतीच्या 32 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम यानिमित्ताने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे.

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तमाम पिंपरी चिंचवडकर यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy