बातमी24तास,(वृत्त सेवा )
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आज चाकण व महाळुंगे पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये वाहतुक कोंडी समस्या निवारण संदर्भात पाहणी करुन गॅब्रियल कंपनी, चाकण येथे संयुक्त वाहतुक नियोजन आढावा बैठक घेतली.
सदर बैठकी करिता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड विधानसभा सदस्य) , नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे 05 अधिकारी, एमआयडीसी इंजिनियर, तहसीलदार खेड, गट विकास अधिकारी खेड, कार्यकारी अधिकारी चाकण नगरपरिषद, परिवहन वाहतुक आयुक्त व परिवहन वाहतुक निरीक्षक, पिंपरी चिंचवड मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचे 03 अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, प्रकल्प अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, शिरूरचे खासदार यांचे स्वीय सहायक, नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे 02 कंत्राटदार, राज्य वाहतुक विभागाकडील 02 अधिकारी तसेच पोलीस उप-आयुक्त वाहतुक, पोलीस उप-आयुक्त परि.-3, सपोआ वाहतुक, सपोआ चाकण विभाग, पोलीस निरीक्षक वाहतुक, चाकण व महाळूंगे तसेच चाकण व महाळुगे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि औद्योगिक विकास महामंडळ, खाजगी कंपन्यांचे एच.आर.ओ. इत्यादी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये चाकण व महाळुंगे परिसरातील वाहतुक समस्यांचा आढावा घेवून सध्याची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच इतर संबंधित विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून समस्या निवारणाबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.