बातमी 24तास चाकण, प्रतिनिधी
गावाची एकी अबाधित रहावी म्हणून संचालकानी सहा महिन्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी संधी देण्याचे संचालकानी ठरविले. त्यानुसार मागील अध्यक्ष श्री. यशवंत बबन फडके व उपाध्यक्ष श्री. जितेंद्र रामलाल आल्हाट यांनी राजीनामे दिल्याने त्यांचे रिक्त जागेवर खेड तालुका सहकारी देखरेख संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा सहकारी देखरेख संघाचे संचालक पोपटराव महादू येळवंडे यांच्या सौभाग्यवती सौ. बेबीताई पोपटराव येळवंडे यांची अध्यक्ष म्हणून व उपाध्यक्ष म्हणुन विकास बालींग येळवंडे यांची अविरोध निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. निघोजे विकास सोसायटीचे कर्ज वाटप हे ३७० सभासदांना असुन रक्कम रु. ३ कोटी २५ लाख इतके आहे. संस्था दर वर्षी बँक पातळीवर १०० टक्के वसुल देत आहेत. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन श्रीमती एस. एम. बगाटे मॅडम यांनी काम पाहीले. तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून चंदन अशोकराव पानसरे यांनी काम पाहीले. यावेळी स्वामी विष्णु येळवडे, कैलास दशरथ येळवंडे, यशंवत बबन फडके, सत्यवान ज्ञानेश्वर येळवंडे, अमित शशिकांत येळवंडे, बाळासाहेब पिराजी पानसरे, विकास गजानन येळवंडे, जितेंद्र रामलाल आल्हाट, सौ. मिराबाई वामन मराठे, बाळासाहेब मधुकर भंडलकर, सुरेश किसन शिंदे, योगेश बाळासाहेब येळवंडे, गजानन गणपत येळवंडे, संस्थेचे सहाय्यक सचिव संतोष विठोबा लिभोरे व गावचे ग्रामस्थ हे मान्यवर उपस्थित होते.