बातमी 24तास
(प्रतिनिधी आरिफभाई शेख)
तीर्थक्षेत्र आळंदीचा रहिवास भाग मोठा वाढला आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत चालत येताना वयोवृद्धांना त्रास होतो त्यात बरेच अंशी अशा घटनेमध्ये आजारी लोक असतात ही गरज लक्षात घेता. आळंदीतील माऊली ग्रुप व्यापारी तरुण मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने श्री भैरवनाथ महाराज उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ आळंदीकर यांनी विशेष पाठपुरावा करत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उपाध्यक्ष भाऊ रासने यांच्या सहकार्याने दानशूर व्यक्तिमत्व सतीश भाऊ मराठे यांचे आई वडिलांच्या स्मरणार्थ सुमारे 26 लाख रुपये किमतीचा भव्य वैकुंठ रथ आळंदीकर यांच्या सेवेसाठी प्राप्त करून दिला.
माऊलींच्या महाद्वारामध्ये या रथात लोकार्पण खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी सुमारे दोन किलोमीटर अंत्यविधीसाठी लोक अनवाणी येतात हा अनुभव खेड तालुक्यातील सांगितला आणि सोळाव्या संस्काराचे वैकुंठ रथ देऊन पुण्य केल्याचे सार्थक होईल असे उद्गार या प्रसंगी आमदार मोहिते पाटील यांनी काढले.
डबल टायर असलेला हा सर्वात मोठा वैकुंठ रथ आहे. सुमारे पाच वर्षे श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ समस्त ग्रामस्थ आळंदीकर हा वैकुंठ रथ आळंदीला यावा यासाठी प्रयत्नशील होते. मात्र योग येत नव्हता आळंदीतील महाद्वार तील माऊली ग्रुप, व्यापारी तरुण मंडळ यांच्या सहयोगाने हे सार्थक झाले. या वैकुंठरथा ची चावी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आणि श्री सतीश मराठे. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊ रासने यांचे शुभहस्ते श्री भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील. विश्वस्त प्रकाश घुंडरे विश्वस्त आनंदा मुंगसे विश्वस्त बाळासाहेब कुराडे रमेश जाधव यांना प्रदान करण्यात आलीत्यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त देखने. प्रदेश प्रतिनिधी श्री डी डी भोसले पाटील. श्री प्रकाश कुऱ्हाडे पाटील. माजी नगरसेवक आनंदराव मुंगसेग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे..प्रकाश घुंडरे.पालखी सोहळा मालक बाळासाहेब अर्फळकर. ज्ञानेश्वर गुळुंजकर महेश गोरे.अजित मधवे. बाळासाहेब कुऱ्हाडे ,रमेश जाधव, माऊली दिघे, राहुल भोर, मनोज कुराडे. संकेत वाघमारे. भाविक आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.