बातमी 24तास
(आळंदी,प्रतिनिधी:आरिफ शेख)
लोकसभा निवडणूक देशाच्या निकालाचे बाबत नागरिकांमध्ये उत्कंठता आहे. त्यात बरेचसे बेजबाबदार कृत्य हे समाजाला भोगाव लागते. आणि ज्यांच्यामुळे हे होतं त्यांना काही त्रास नसतो परंतु त्यांच्यामुळे समाजाला नाहक त्रास होतो. या आणि अशा कारणासाठी दिनांक चार जून रोजी येणाऱ्या निकालानंतर आळंदी पोलीस स्टेशन ने एक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये आळंदीतील तमाम सोशल मीडिया ग्रुप वर कुठल्याही प्रकारची शांतता भंग होईल असे तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाला त्रास होईल किंवा एखाद्या विशिष्ट समाजावर व्यक्तीवर किंवा सर्वसामाजिक पक्षांवर असो किंवा व्यक्तिगत पक्षावर असो केलेली टीका टिप्पणी महागात पडू शकते. अशा सूचना आळंदी पोलीस स्टेशन कडून जारी करण्यात आले आहेत. ज्या सोशल मीडिया ग्रुप वर अशा प्रकारच्या पोर्ट व्हायरल होतील त्या ग्रुप सदस्य असेल ग्रुप ॲडमिनलाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहेत. त्याचबरोबर ना डीजे बजेगा ना फटाका फुटेगा.. असं सिंघम स्टाईल सूचना सामाजिक हित राखण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशन यांचे मार्फत पोलिसांकडून देण्यात आली आहे. याची तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी आळंदी आणि पंचक्रोशी भागावर राहणार आहे देशाचा निकाल उद्या सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात होईल आणि या नात्या कारणाने द्वेष पसरून सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी आळंदी पोलीस स्टेशन ने ही खबरदारी घेतली आहे.