बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
(पुणे प्रतिनिधी ) – पुणे कौटुंबिक न्यायालयात ऑनलाइन पद्धतीचा वापर करून कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे.दि.18 मे 2024 ऑनलाईन पद्धतीचा आजच्या युगात खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.पुणे न्यायालय सुद्धा ऑनलाईन पद्धतीचा वापर करत न्यायालयीन कामकाजात करीत आहे.त्यामुळे न्यायालयांच्या खटल्यांचा निपटारा राहून पक्षकरांचा वेळ वाचून त्यांना सुलभ पद्धतीने न्याय मिळत आहे.अशाच पद्धतीने पुणे येथील कौटुंबिक न्यायालय क्रमांक-2 यांनी नुकताच एका प्रकरणांमध्ये पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीचा वापर करून दांपत्याचा घटस्फोटाचा मजूर केला पती( मूळ नाव बदललेले) हे नोकरीनिमित्त गेले काही वर्षापासून नायजेरियातच राहत होते. तर पत्नी( मूळ नाव बदल) पुण्यात राहत होती. कौटुंबिक न्यायालयाने नायजेरिया मधून पतीची ऑनलाईन प्रक्रिया मार्फत सर्व सुनावणी पार पडली. ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून घटस्फोट मंजूर. या खटल्याचे कामकाज ऍड.शिवशंकर एस. आघाव व ॲड. गायत्री रोकडे यांनी पाहिले.या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला असून दोघांनाही आनंद झाला आहे.
ऑनलाइन प्रक्रिया ही काळाची गरज आहे न्यायालयाने सुद्धा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केलेला आहे वकिलांनी सुद्धा ऑनलाईन प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे न्यायालयाचा वेळ वाचून पक्षकारांना न्याय मिळण्यास मदत होते असे ऍड.शिवशंकर आघाव यांनी मत व्यक्त केले.