जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव येथे प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये झाला मृत्यू

Share This News

बातमी 24तास

Web News Portal

(क्राईम रिपोर्ट)

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. हल्ल्या झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते .मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.हल्लेखोरांनी भर दुपारी वर्दळ असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली.शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या खून प्रकरण ताजे असतानाच आज तळेगावचे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगावात दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून कोयत्याने वार करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले, त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्राणज्योत मालवली आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन नगर परिषद कार्यालयाच्या खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. आवारे यांच्यावर झालेला हा हल्ला अतिशय भयानक होता. दवाखान्यात उपचारा साठी दाखल केल्यानंतर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy