बातमी 24तास, Web News Poratl
(प्रतिनिधी आरिफ शेख)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे.आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस उपआयुक्त विवेक पाटील, यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस कार्यक्षेत्रात सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीमध्ये पायी गस्त केली जाणार आहे, वरील पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने ही पायी ग्रस्त आळंदीत करण्यात आली,यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्या कामी, तसेच महिला, मुली,यांच्या सुरक्षितेसाठी,त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, उनाडपणा करणाऱ्या मुले,इसम आणि समाजविघातक कृती करणारे इसम यांच्यावर कारवाई केली जात आहे, कायद्याचा धाक आणि इतर गुन्ह्यांना आळा बसण्याच्या कामी ही गस्त घालण्यात येत आहे, यामध्ये बेकायदेशीर प्रमाणात आढळणाऱ्या कृतीवर धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे,सहाय्यक पोलिस निरिक्षक बी एम जोंधळे, आणि पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस उपनिरीक्षक बी एम जोंधळे,तसेच पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, महिला पोलीस ट्राफिक पोलीस, आणि पोलीस हवालदार टीम असे दहा ते बारा जणांच्या या टीम चे रोजची पेट्रोलिंग शहरात सायंकाळी सहा ते रात्री आठच्या दरम्यान आळंदीत सुरू झालेली आहे, आज नऊ पार्किंगच्या बोर्ड खाली लावण्यात आलेल्या गाड्यांवर या घरची दरम्यान कारवाई करण्यात आली त्याचबरोबर रहदारीत अडथळा होईल अशा दुकानदारांनाही समज वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेले आहे.