
बातमी 24तास
राजगुरूनगर (प्रतिनिधी, प्रभाकर जाधव) : राजगुरुनगर (चांडोली) परिसरात असलेल्या प्रसिद्ध अमूल डेअरी या देशातील सर्वात मोठ्या दूध कंपनीच्या शाखेकडून स्वच्छता व प्रदूषणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांमधून वाढत आहे.
गेल्या काही दिवसांपासून डेअरी मधील दूध सरळ सरळ दोंदे – कडूस रस्त्यावर वाहत येत आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल साचून पादचारी व दुचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, रस्त्याच्या कडेने अंदाजे वीसहून अधिक टॅंकर सतत उभे राहत असल्याने रस्ता अरुंद झाला असल्याने वाहतूकीला अडथळा होत आहे.
डेअरीच्या पार्किंगमधूनही चिखल रस्त्यावर येऊन साचत असल्याने परिसरात ‘चिखलाचे साम्राज्य’ झाले आहे. त्यामुळे पादचारी त्रस्त झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय, दूधाचा तीव्र वास आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.स्थानिक नागरिकांकडून विचारणा होत आहे की, “प्रदूषण व चिखलापासून मुक्ती मिळवून देण्याची जबाबदारी नेमकी अधिकाऱ्यांची की या श्रीमंत दूध कंपनीची?”