जेष्ठ नाट्य दिग्दर्शक रामदास काळे यांना कला सारथी कलामंच पुणे आणि गगनभरारी अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा.अशोक वंजारे खेड (राजगुरुनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने केले सन्मानित

Share This News

बातमी 24तास (वृत्त सेवा)

जेष्ठ नाट्य दिग्दर्शकाच्या वाढदिवशी कविसंमेलन

” नट येतील जातील पण कला अमर आहे आणि राहणार.कलेचे अस्तित्व कोणाच्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही. गेली पाच तपे नाट्यकलेची सेवा केल्याचे सार्थक झाले.” असे भावनिक उद्गार जेष्ठ नाट्यदिग्दर्शक रामदास काळे यांनी काढले. कला सारथी कलामंच पुणे आणि गगनभरारी अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा.अशोक वंजारे खेड (राजगुरुनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. आमदार बाबाजीशेठ काळे यांचे सुपुत्र मृण्मय काळे यांच्या हस्ते जेष्ठ रंगकर्मी रामदास काळे यांचा जंगी सन्मान करण्यात आला.

यावेळी निमंत्रीत कवी संमेलनाचे आयोजन जेष्ठ समाजसेविका अलकाताई जोगदंड यांनी केले होते. कवी संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार बबन कदम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष कवी आणि लेखक संतोष गाढवे,लोककला व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक बाबाजी कोरडे,जेष्ठ भारुड कलावंत तुकाराम गाडे यांच्या हस्ते पार पडले.डाॅ.निलम गायकवाड,बाबाजी शिंदे, डी.के. वडगावकर, मधुकर गिलबिले सर,मिनाक्षी डफळ पाटोळे, रघुनाथ चौधरी सर, सपना राठोड, सारिका दरवेशवार, आदी कवींनी उत्फुर्त सहभाग नोंदवला. प्रास्ताविक अशोक वंजारे यांनी तर सूत्रसंचालन संतोष गाढवे यांनी केले. कार्यक्रमासाठी सरपंच लक्ष्मण भालेराव, हेमंत विरकर, मयुर सातकर, नाट्य रसिक नागरिक आणि गगनभरारी अकॅडमीचा विद्यार्थीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy