स्वारगेट-पिंपरी मेट्रो प्रवास अवघ्या ३० रुपयांत

Share This News

बातमी24तास,(वृत सेवा) स्वारगेटहून पिंपरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोचा नवा मार्ग रविवार पासून सुरु झाला आहे. हा प्रवास अवघ्या ३० रुपयांत करता येणार आहे.शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिका रविवार दुपारी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली झाली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दी वेळी दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.स्वारगेटपासून मंडई अवघ्या दहा रुपयांत आणि जिल्हा न्यायालयापासून मंडई स्थानकापर्यंतचा प्रवास पंधरा रुपयांत करता येणार आहे. स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रो सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड, रामवाडी आणि वनाज परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्‍या प्रवाशांची विनाविलंब वेगवान सोय होणार असल्याने सणासुदीच्या काळात मध्यवर्ती शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल त्यामुळे वाहतूक कोंडीही होणार नाही अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy