बातमी 24तास (वृत्त सेवा ) 02 ऑक्टोबर गांधी जयंतीचे दिवशी (ड्राय डे) हॉटेल/ढाबा वर बेकायदेशीर दारु विक्री करणा-यांस अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, श्रेपोउपनि जिलाणी मोमीन, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, निखिल शेटे व निखिल वर्पे असे आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अधिकारी जिलाणी मोमीन व पोलीस अंमलदार प्रदिप शेलार यांना मिळालेल्या माहितीवरुन हॉटेल शिवनेरी येथे सुरेश खडकसिंग विश्वकर्मा, वय 42 वर्षे, रा शिवाजीवाडी मोशी, ता हवेली जि पुणे याच्या ताब्यातुन एकुण 1,41,925/- किंमतीची देशी विदेशी दारु, बियरच्या बाटल्या, रोख रक्कम व मोबाईल असा माल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द आळंदी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.