बातमी24तास,ऑनलाईन न्यूज पोर्टल
(वृत्त सेवा)
शिवसेना (उद्धव ठाकरे ) गटाकडून नुकताच मुंबईत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला गेला . यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड -आळंदी शिरूर मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद आणि पक्षाकडे मतदारांचा वाढता कल पाहता याबाबत विधानसभेला तेथील अधिक जागा घेण्याची मागणी खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे,माजी आमदार कै. सुरेश गोरे यांचे बंधू राहुल गोरे, चाकण शहर प्रमुख शेखर घोगरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली.
यावेळी, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सचिन आहिर,रवींद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासह त्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने तयारी वरही शिवसेनेच्या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .
यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिरूर मतदारसंघातील २०१९ ची व सद्यस्थितीची माहिती घेतली. यामध्ये ठाकरे गट सेनेने खेड आळंदी विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. या मतदार संघातील शिवसेनेचे पहिले माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी प्रतिनिधित्व केलेले असल्याने या मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. अशी माहिती चाकण शहर शिवसेना प्रमुख (ठाकरे गट)शेखर घोगरे यांनी दिली.