खेड तालुका पत्रकार संघाच्या 2023 – 2024 या वार्षिक कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी नितीन सैद यांची तर उपाध्यक्ष पदी मनोहर गोरगल्ले, अरिफ शेख यांची सर्वानुमते निवड
खेड तालुका पत्रकार संघाच्या 2023 – 2024 या वार्षिक कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी नितीन सैद यांची तर उपाध्यक्ष पदी मनोहर गोरगल्ले, अरिफ शेख यांची सर्वानुमते निवड
(प्रतिनिधी,अभिजित सोनवळे) चाकण येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे खेड तालुका पत्रकार संघाची मासिक बैठक पार पडली. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाच्या 2023 – 2024 या वार्षिक कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नितीन सैद तर उपाध्यक्षपदी मनोहर गोरगल्ले व आरीफ शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी लहू लांडे, सचिवपदी अर्चना हजारे, खजिनदारपदी सचिन आल्हाट, संघटकपदी बापूसाहेब सोनवणे, प्रवक्तेपदी अजय जगनाडे, समन्वयक म्हणून दत्तात्रय घुले, संपर्क प्रमुख म्हणून विलास दाभाडे, कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. प्रीतम शिंदे व अॅड. रवींद्र कुटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष सम्राट राऊत यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश कार्यकारिणीकडे खेड तालुका सभासदांच्या समन्वयातून पुढील वार्षिक कार्यकारिणीची शिफारस केली व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नवनिर्वाचित अध्यक्षपदाचा पदभार नितीन सैद यांचे कडे तसेच माजी उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्षपदाचा पदभार मनोहर गोरगल्ले व अरीफ शेख यांच्याकडे सोपवला. तत्पूर्वी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी साधक बाधक चर्चा करत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नवीन पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील प्रिंट मीडिया व डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानपूर्वक बरोबर घेऊन सामाजिक कार्य करत असताना समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार असल्याचे नितीन सैद यांनी सांगितले. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक कल्पेश भोई, अभिजीत सोनावळे, प्रशांत कुमार नाईकनवरे, हर्षल परदेशी, रामचंद्र पाटील, तसेच खेड तालुका पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.