पार्किंगच्या वादातून पीएमपीएमएल बस चालकाला रिक्षा चालकाची मारहाण; गुन्हा दाखल

Share This News

बातमी 24तास Web News

(वृत्त सेवा)

चाकण : वाहन पार्किंगच्या वादातून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या चालकाला मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (ता.३ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण चौकाजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी-महाळुंगे मार्गावर ट्रिप संपल्यानंतर पीएमपीएमएल चालकाने त्यांची बस सेवा रस्त्याजवळ उभी केली होती आणि रिक्षा चालकाने त्याची रिक्षा बसजवळच पार्क केली. पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकाने पीएमपीएमएल चालक मोहन मळेकर (५४) यांना शिवीगाळ करून मारहाण केली असा आरोप आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सचिन (पूर्ण नाव माहित नाही )नावाच्या आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३२४, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy