मीना खोरे संघर्ष समितीचे एक दिवसीय उपोषण शांत तेत स्थगित दहा गावांनी व्यवहार बंद ठेवून उपोषणास पाठींबा

Share This News

बातमी 24तास

(जुन्नर /आनंद कांबळे) मीना खोऱ्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या जवळपास १० ते १२ गावांच्या पाणी प्रश्नांसाठी ३२ वर्षाच्या लढ्यानंतर जुन्नर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे.या उपोषणात हजारोच्या संख्येने मीना खोऱ्यातील शेतकरी ,महिला,ज्येष्ठ नागरिक,तरुण वर्ग,राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये माजी आमदार शरद सोनवणे,भाजप नेत्या आशाताई बुचके,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे,मीना खोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश शेंणकर,सचिव प्रशांत पाबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमित बेनके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास हांडे, मनसे तालुका प्रमुख साईनाथ ढमढेरे,जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्य संचालिका प्रियांका शेळके,जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापा खोत,पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव ढोले,संजय निराधार योजने चे अध्यक्ष अरुण पारखे, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, खिलारवाडीचे सरपंच दिलीप खिलारी,वडगाव साहनीचे सरपंच वैशाली तांबोळी,बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे,धामणखेल सरपंच संतोष जाधव, गुंजाळवाडीचे माजी सरपंच विकास दरेकर,नगरसेवक भाऊ कुंभार,धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके,बाबा परदेशी,जयराम खिलारी, प्रा.शरद मनसुख,रेणुका वारे,युवा नेतृत्व विकी पारखे,अनिल मनसुख यांनी या उपोषणास पाठींबा दिला.जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून उपोषणास प्रारंभ केला.या प्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे,भाजप नेत्या आशाताई बुचके,सत्यशील शेरकर,अमित बेनके या सर्वांनी जुन्नर तालुक्यात पाच धरणे असून त्याचा मीना खोऱ्यातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नसेल तर योग्य नाही अशी भूमिका घेत मीना खोरे पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे शेतकऱ्याना आश्वासन दिले.शेवटी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी अभियंता राजेंद्र टोडपकर यांच्या विनंतीमुळे उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार सारिका रासकर,उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी,पोलिस निरीक्षक संदिप पर्वते,पोलिस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.अत्यंत शांततेच्या मार्गाने उपोषण मागे घेण्यात आले.

*प्रतिक्रिया..

मीना खोरे संघर्ष कृती समितीच्या ३२ वर्षाच्या लढ्यानंतर एक दिवसीय उपोषणास दहा – बारा गावांनी जाहीर पाठिंबा देत गावातील संपूर्ण व्यवहार बंद करून हजारो शेतकरी,महिला,ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग,उपोषणात सहभागी झाल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल,अशी आशा वाटते. १५ ऑगस्ट पर्यंत योग्य निर्णय झाला नाही तर स्वातंत्र्यदिनी सावरगाव च्या मीना नदीत जलसमाधी घेणार आहोत, त्यामुळे सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा .सुरेश शेणकर (अध्यक्ष) प्रशांत पाबळे(सचिव )मीना खोरे संघर्ष कृती समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy