(प्रतिनिधी,अजय जगनाडे, ) चाकण गावचे मा.ग्रामपंचायत सदस्य अमोल घोगरे यांनी मयत गौधनाचे विधीपूर्वक अंत्यविधी आणि दशक्रिया विधी संपन्न करून गौमातेला आदरपूर्वक आपल्या कुटुंबातील सदस्याचा दर्जा दिला.शुक्रवार, दिनांक 21/07/2023 चाकण मधील माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल शंकरराव घोगरे यांनी लहानपणी केलेल्या संकल्पा प्रमाणे पहिल्या पुत्रप्राप्ती नंतर घरामध्ये दोन गोधनाचे पालन पोषण सुरू केले होते.त्यांच्या मुलाचे जितके वय आहे तितकीच वर्षे या गोधनाला त्यांनी अतिशय आपुलकीने सांभाळले, या दोन गोमाता त्यांची नावे अनुक्रमे लक्ष्मी आणि लाली असे देखील ठेवले, त्यांच्या सोबतीला आणखी चार गोवंशाचे देखील घोगरे कुटुंबीय अतिशय आपुलकीने पालन पोषण करत होते.
अमोल घोगरे यांचा वडिलोपार्जित लाकडाच्या वखारीचा व्यवसाय आहे त्याचबरोबर शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात, वडिल शंकरराव घोगरे कौटुंबिक कर्तव्य पार पाडून वृद्धापकाळमुळे घरीच असतात, अमोल यांचे थोरले बंधू अतुल घोगरे हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत आहेत, वडिलोपार्जित सामाजिक कार्याचा वसा भेटलेल्या अमोल घोगरेंच्या लक्ष्मी या गोमातेला शुक्रवार दिनांक 21/07/2023 रोजी दुपारी 01:30 वाजता अचानकच काहीतरी त्रास झाला आणि ती मृत झाल्याचे कळताच आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याप्रमाणे संपूर्ण घोगरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली, परंतु तब्बल साडेनऊ वर्षाचा सहवास लाभल्यानंतर जी आपुलकी या गोमातेबद्दल घोगरे कुटुंबीयांना होती, त्याप्रमाणे लक्ष्मी या गोमातेचा अंत्यविधी हा संपूर्ण विधिवत करावा अशी त्यांची इच्छा होती, आपल्या लाकडाच्या वखारीच्या जागेमधील थोडीशी जागा त्यांनी या दफनविधीसाठी सुनिश्चित केली अगदी त्यांच्या घरासमोर व गोठ्याच्या समोरच लक्ष्मीचा दफनविधी सुरू होता, परंतु जशी घोगरे कुटुंबीयांना लक्ष्मी बद्दल आपुलकी होती तितकाच लळा लाली या गौमातेला देखील लक्ष्मी बद्दल होता, लक्ष्मीचा दफनविधी लाली गोठ्यातूनच पाहत होती आणि इतक्या वर्षाची आपली सोबतीन आपल्याला सोडून गेल्याचे जाणवताच लक्ष्मी या गौमातेचा अंत्यविधी सुरू असतानाच दुपारी सुमारे 04:45 वाजता लाली या गौमातेने देखील आपला देह ठेवला, आधीच दुःखात असलेल्या घोगरे कुटुंबीयांवर आणखीन एक आघात त्याच दिवशी झाला, घोगरे कुटुंबीयांनी लक्ष्मीच्या शेजारीच लाली या गौमातेला देखील दफन केले, इतकेच नाही तर आपल्या घरातील एखादा सोयरा गेल्यानंतर जसे आपण सोयरेसुतक पाळतो त्या पद्धतीचे सोयरेसुतक पाळून संपूर्ण विधीवत या दोन्ही गौमातेचा दशक्रिया विधी देखील संपन्न केला, दशक्रिया च्या दिवशी अन्नदान करून समाजात एक नवीन आदर्श देखील घोगरे कुटुंबीयांनी निर्माण केला आहे, अलीकडच्याच काळात चाकण शहरामधील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते शरद धाडगे यांनी देखील आपल्या गौमातेचे बाळंतपण अतिशय थाटात साजरे केले होते, आपल्या घरच्या कन्येचे जसे आपण डोहाळे जेवण घालून तिचे लाड पुरवत असतो त्याचप्रमाणे शरद धाडगे आणि कुटुंबीयांनी देखील त्यांच्या घरच्या गौमातेचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करून अन्नदान केले होते, आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर अशी ओळख असणारे खेड तालुक्यातील कडूस गावामध्ये झालेल्या गौहत्येच्या निषेधार्थ देखील चाकण शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आणि शहरातील सर्व हिंदुत्ववादी व सामाजिक संघटनांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चाकण बंद करून प्रशासनापर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
चाकण मधील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून गौहत्या व गोवंश तस्करी च्या घटनांवर आणि दोषींवर करडी नजर ठेवून असतात, चाकण शहराची हद्द पार करून जाणे म्हणजे अशा नराधमांसाठी मोठ्या जिकरीचे काम असते, या सर्व कार्याची आणि गोमातेबद्दलच्या आपुलकीची आणि आस्थेची चाकण आणि पंचक्रोशी मध्ये मोठी चर्चा आहे, त्याचबरोबर अमोल घोगरे आणि शरद धाडगे यांच्या परिवाराने केलेल्या अशा उपक्रमांची प्रशासनासह पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कौतुकास्पद चर्चा आहे..समाजातील सर्व स्तरातून चाकण मधील गोवंश प्रेमाचे इतर ठिकाणी दाखले दिले जात आहेत ही चाकण शहरवासीयांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.