(प्रतिनिधी आरीफभाई शेख)आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते त्याचबरोबर आळंदीकर सोडून इतर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रहिवासी म्हणून आळंदीत वास्तव्य असण्याची संख्या त्या प्रमाणात मोठी आहे . आळंदी पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेल्या पत्रकानुसार आळंदी मध्ये यापुढील काळात भाडेकरार बंधनकारक करण्यात आलेला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून आलेल्या आदेशान्वये सदर कारवाई केले जात असल्याची माहिती आहे अप्रिय घटना टाळण्यासाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या भाडे करार बंधनकारक करण्यात आलेला असून भारतीय दंड संहिता 188 या कलमान्वये अंमलबजावणी केली जाणार आहे. घर मालकाने भाडेकरार केल्याची प्रत आळंदी पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ऑनलाईन भाडे करार केलेला असेल तर त्याची एक प्रत आळंदी पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना आहेत.
या नियमाचे घरमालकांकडून उल्लंघन झालेत घरमालकावरही भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर अवाजवी अनामत रक्कम मागणाऱ्यावरही याच नियमाने कारवाई केली जाईल अशा सूचना प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर वरील सूचनांचा उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास अथवा तक्रार आल्यास वरील नियमाप्रमाणे घर मालकाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे तसेच घर मालकाच्या दृष्टीने सुरक्षिततेचे असल्याचे भाडेकरार बंधन हे पुढील दृष्टीने उपयोगी ठरणार असल्याचे आणि घर मालकाची जोखीम कमी करणारे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले आहे.