
द टाइम्स ऑफ महाराष्ट्र
Digital News
मुंबईःमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी पासून सुटका होण्यासाठी दोन बोगद्यांचे काम हाती घेतले आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा १.७५ किलोमीटर आणि दुसरा ८.९३ किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. या प्रकल्पातील दोनपैकी एक बोगदा हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा बोगदा असेल. २३ मीटर रुंदी असणाऱ्या या दोन बोगद्यांमध्ये चार मार्गिका असणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बोगद्यांची डेडलाइन सातत्याने वाढवण्यात येत आहे. पहिले लॉकडाऊनमुळं या कामात अडचणी आल्याने बोगद्याच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर २०२४मध्ये काम पूर्ण होईल, असं सांगण्यात आल. मात्र आता जानेवारी २०२५पर्यंत काम पूर्ण होऊन प्रवाशांसाठी खुला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.अडीच किलोमीटर अंतर बोगदा हा लोणावळा धरणाच्या जलाशयाच्या ११४ ते १७५ मीटर खालून जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा (बोरघाट) घाटात होणारी रोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा बसेल. या प्रकल्पामुळे अवजड वाहनांसाठी खंडाळा घाटमाथा परिसरात लागणारा प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल आणि घाटातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर टोलनाका ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे सुमारे १९ किमीचे अंतर १३. ३ किमीवर येणार आहे. त्यामुळं प्रवासाचा अर्धा तास वाचणार आहे.मुंबई व पुणे कडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेजव्दारे जोडण्यात येत आहेत. लोणावळा खंडाळा डोंगर, पठारावरील दऱ्यांतून नऊशे मीटर लांबीचा एक व्हायडक्ट पूल व दुसरा ६५० मीटर अंतराचा केबल स्टॅन्ड पुल असणार आहे. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. या बोगद्यांमुळं वाहतूक कोंडीची कटकट मिटणार आहे.या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.