बातमी 24तास
(प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा नियम होता. परंतु राज्य सरकारच्या नवीन परिपत्रकानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार असून नापास झाल्यानंतर पुढच्या वर्गात जाता येणार नाही. आठवीपर्यंत सरककट पास करण्याचा राज्य शासनाचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वार्षिक परीक्षेत पास होणं बंधनकारक असेल. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या परीपत्रकानुसार आता शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा नियम होता. परंतु राज्य सरकारच्या नवीन परिपत्रकानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार असून नापास झाल्यानंतर पुढच्या वर्गात जाता येणार नाही. पहिल्या प्रयत्नात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार आहे. परंतु दुसऱ्या संधीनंतर नापास झाल्यास पुढच्या वर्गात जाता येणार नाही.राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली आहे. या निर्णयानुसार पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. मात्र, त्या परीक्षेतही नापास झाल्यास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे. याआधी सर्व विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत सरसकट पास केलं जात होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचं गांभीर्य राहीलेलं नाही असं काहींचं म्हणणं होतं. पण आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयामागे एक मोठी विचार प्रकीया होती. आता घेतलेला सरकारचा हा निर्णय योग्य नसल्याचं सांगत काही संघटना या निर्णयाला विरोध करत आहेत.काय आहे नवी अधिसूचना ?इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश देण्यात येईल. पण पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुर्नपरीक्षा, मूल्यमापन याची कार्यपध्दती निश्चित करेल.जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही तर अश्या विद्यार्थ्याला संबंधित विषयासाठी शिक्षकांकडून अधिकचे मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांच्या आता पुर्नपरीक्षा घेतली जाईल.जर विद्यार्थी पुर्नपरीक्षेतही नापास झाले तर पाचवी किंवा आठवीच्या वर्गात अश्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जाईल.प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही. शिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया?जिल्हा परिषद शिक्षक भाऊ चासकर यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले. “ना-नापास धोरणामागे मोठी विचारप्रक्रिया होती. सध्या अनेक शिक्षक नापास करायच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे याचे नवल वाटते. . मात्र याचा नीट विचार करायला हवा.सरकारने सर्वप्रथम शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे. योग्य शिक्षक असतील, तरच विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली होईल,” असं मत पालकांनी नोंदवलं आहे.
*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*
🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या*
*📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:*
*📱9420159059*
*📱8796164028*…