(प्रतिनिधी, राज पाटील ) फोनवर कोणाशी बोलते असे विचारले म्हणून महिला घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला.याबाबत महिलेचा पती अरुण किशोर लहाने यांनी सुलतानपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे पोलीस ठाण्यामध्ये हरविल्याची तक्रार दिली आहे.याबाबत ची अधिक माहिती अशी की, अरुण किशोर लहाने वय 33 वर्षे व्यवसाय ठेकदारी, रा. सुलतानपुर ता.लोणार जि.बुलढाणा, हे आपली पत्नी सौ. मोहीनी अरुण लहाने दर 32 वर्ष एक मुलगा आर्यन वय 07 वर्षे व आई आईसह राहतात, अंदाजे 15 दिवसापूर्वी दुपारचे वेळेस अरुण हे अचानक आपल्या घरी आले असता पत्नी मोहिनी फोनवर कोणाशी तरी बोलत असताना दिसली त्याबाबत विचारलं असता माझ्या दाजीचा फोन आहे. असे सांगितले परंतु अरुणला संशय आल्याने त्याने पत्नीला रागवले त्यानंतर ती फोनवर बोलताना दिसली नाही. दि. 10/05/2023 कार्यक्रम असल्याने मी सकाळी 07.00 वा सुमारास गावी गेलो होतो म कार्यक्रमावरून घरी आल्यावर पत्नी मोहोनी घरी दिसली नाही म्हणून आई सौ.कमल किशोर लहाने यांनी सांगितले की दुपार पर्यंत मोहिनी घरी चा होती,दुपारी 03.00 वाजेचे सुमारास ती निघून गेली असे सांगितले म्हणून गावात बस स्टॅन्डवर जाऊन पत्नीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.आली येथून पत्नीचे सामान पाहीले असता मलाचे दागीने आधारकार्ड कार्ड ठेवलेले नगद 25000/ दिसले नाही निघून असल्याची शंका आल्याने मी माझी सासरवाडी व इतर नातेवाईका कडे विचारना केली असता माझी पत्नी त्यांच्या कडे आली नसल्याचे सांगितले. तदनंतर लहाने यांनी पोलीस ठाण्यात पत्नी हरवली असल्याची तक्रार दिली आहे. मोहिनी यांचे वर्णन पुढीलप्रमाणे रंग काळा सावळा,अंदाजे उंची 5.5 फूट, अंगात पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचा ब्लाउज, पायामध्ये पांढऱ्या रंगाच्या चपला, सडपातळ बांधा, केस काळे लांब, उजव्या हातावर इंग्रजीत अरुण असे लिहिले आहे. याबाबत कोणास काही माहिती असल्यास अरुण किशोर लहाने यांनी 9850623055 या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.