बातमी24तास आळंदी (वृत्त सेवा)
खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त चाकण मध्ये विविध सामाजिक उपपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका आणि गोरे कुटुंबियांच्या वतीने अभिवादन सभा झाली. यावेळी विविध कार्यक्रमांसह स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता सन्मान पुरस्कार यामध्ये उद्योगरत्न पुरस्कार भरत कानपिळे, बाळासाहेब मांजरे. आरोग्यदूत पुरस्कार सुनीलशेठ शहा, रवी लोहिरे, शिक्षणरत्न पुरस्कार संजयजी नाईकडे, सेवाभावी संस्था पुरस्कार माऊली सेवा प्रतिष्ठान खेड कैलास दुधाळे, क्रीडाभूषण पुरस्कार मॉर्डन हायस्कूल भोसे, वनश्री पुरस्कार सपना राठोड, समाजसेवा पुरस्कार सत्यवान नवले, कलारत्न पुरस्कार निकिता व अवंतिका शंकर बहिरट, सावित्रीबाई फुले पुरस्कार कमल कळमकर, विशेष प्रोत्साहनपर माहिती सेवा पुरस्कार दत्तात्रय साबळे, अर्जुन मेदनकर, कामगार सेवा पुरस्कार अविनाश वाडेकर यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे यांनी केले. त्यानंतर ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. कीर्तन संपन्न झाल्यावर मोठ्या प्रमाणत नागरिकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर, पुणे म्हाडाचे अध्यक्ष व मा.खासदार शिवाजी आढळराव पाटील, भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, खेडचे माजी आमदार रामभाऊ कांडगे, संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रशांत मोरे महाराज, ज्येष्ठ नेते शांताराम बापू घुमटकर, नाना टाकळकर, मारुती सातकर, पुणे जि. प.सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, उपसभापती क्रांतीताई सोमवंशी, माजी सभापती हिरामण सातकर, अंकुश राक्षे तसेच संचालक अनुराग जैद, सागर मुऱ्हे, महेंद्र गोरे, माणिक गोरे, अशोक दादा राक्षे, सोमनाथ मुंगसे, सुनील भोमाळे, सयाजी मोहिते, तसेच राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश काहाने, सर्व संचालक,मा. पंचायत समिती सदस्य, राजगुरु नगर सहकारी बँकेचे संचालक किरण आहेर, पंचायत समितीचे सदस्य मच्छिंद्र गावडे, भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, शिवाजीराजे वर्पे, अशोकराव खांडेभराड, तनुजाताई घनवट, ज्योतीताई आरगडे, विजयाताई शिंदे, संजय घनवट, प्रकाशदादा वाडेकर, मुक्ताजीदादा नाणेकर, आळंदी शहर शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, रोहिदास कदम, ताईमाउली महाराज, भाजप नेते सूर्यकांत बारणे, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मंगलताई गोरे, नगरअध्यक्ष राजेंद्र गोरे, शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, धीरज मुटके, नगरसेवक प्रवीण गोरे, निलेश गोरे, महेश शेवकरी, विजयाताई जाधव, दत्ता जाधव, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगर बबनराव कु-हाडे, माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे पाटील, माऊलींचे मानकरी दिनेश कु-हाडे पाटील, शेतकरी नेते एल.बी तनपुरे, योगेश ससाणे, सुरेशभाऊ कौदरे, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, चाकण पतसंस्थेचे चेअरमन अशोक बिरदवडे, व्हाइस चेअरमन प्राजक्ताताई योगेश गोरे व सर्व संचालक, काळूराम कड, शंकर राक्षे, कालिदास वाडेकर, दिनकर तांबे, राहुल थोरवे, गणेश नानेकर, उपशहर प्रमुख माउली घुंडरे, महादेव पाखरे, गोविंद ठाकूर, बद्रीनारायन घुगे, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी अभिवादन सभेत मनोगते व्यक्त केली.