नेवाळे वस्ती चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात!

Share This News

भाजपा आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी- एस.बी.पाटील, मळेकर कुटुंबियांचा सकारात्मक पुढाकार

बातमी24तास(वृत सेवा)पिंपरी प्रतिनिधी

चिखली येथील साने चौक ते नेवाळे वस्ती चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योजक एस.बी.पाटील आणि मळेकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे वाहतुकीला होणारा पत्र्याचे कंपाउंड आणि महावितरण डीपी हटवण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साने चौक ते चिखली रस्त्यावर नेवाळे वस्ती चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी हस्तक्षेप करावा आणि तोडगा काढावा, अशी विनंती केली होती. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जागामालक एस.बी. पाटील आणि मळेकर कुटुंबियांना लोकहिताच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे पत्रे किमान 10 फूट मागे काढून घेतले आहे. त्यादृष्टीने रस्ता रुंदीकरण कार्यवाही सुरू झाली आहे. दुसरीकडे, नेवाळे वस्ती चौकात महावितरण प्रशासनाचा डीपी होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही कामाच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महावितरण प्रशासनाला सूचना केली आणि सदर डीपी हटवण्याचे काम सुरू झाले.

प्रतिक्रिया : भोसरी मतदार संघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्त्याने प्रयत्न करीत आहोत. ज्या ठिकाणी कोंडी होते. त्या ठिकाणी ‘हॉट स्पॉट’ निश्चित केले आहेत. महानगरपालिका, महावितरण, वाहतूक पोलीस आदी विभागांच्या मदतीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. साने चौक ते नेवाळे वस्तीहून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. श्री. एस.बी.पाटील आणि मळेकर कुटुंबियांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy