बातमी 24तास(कल्पेशराघवेंद्रा भोई)चाकण, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यासह नेते निवडणूकपूर्व तयारीत गुंतले आहेत. त्यातच महायुती- महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांचा भरणा अधिक आहे. दरम्यान, खेड-आळंदीचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने ही जागा काका-पुतण्याच ( पवार विरुद्ध पवार ) लढवणार का हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी मतदारसंघाच्या दोऱ्या या पुन्हा अनुभावाकडे जाणार की तरुणाईच्या हाती जाणार हे निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे.
त्यातच नव्या दमाच्या अक्षय जाधव यांनी आपल्या मतदार संघात प्रचारची पाहिली फेरी जवळजवळ पूर्ण केली आहे.तालुक्याच्या राजकारणात नव्याने आलेल्या सामान्य कुटुंबातील अक्षय जाधव यांना कोणताही राजकीय वारसा नसताना देखील शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी मिळाल्या नंतर तालुक्यासाठी विकास काम करून आपले काही योगदान देऊ लागत आहे.ही भावना मनात ठेऊन अक्षय जाधव यांनी आपले राजकीय गुरु खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील,पंचायत समिती माजी सभापती भगवान पोखरकर आणि त्यांचे चुलते रामदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय वाटचालीस सुरवात केली.
अल्पवधीतच आपले राजकीय बस्तान बसविण्यात जाधव यशस्वी झाले आहेत.जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीने इतर पक्षांच्या उमेदवारा विरोधात आव्हान उभे केले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तालुक्यात सर्वात तरुण व इच्छुक उमेदवार म्हणून जाधव तालुक्यातील मतदारा समोर जात आहेत. कोरी पाटी या भूमिकेतून अल्पवधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून अश्वमेघ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.