बातमी24तास,जुन्नर/आनंद कांबळे
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकत्रित १७० जागा निवडून येण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नियोजित वेळी होण्याची शक्यता कमी आहे . किल्ले शिवनेरीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख ,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,शिरूरचे खासदार डाँ.अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार , जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे , विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर , जुन्नर तालुका अध्यक्ष तुषार थोरात, युवक अध्यक्ष सुरज वाजगे ,ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले ,शरद लेंडे, बाजीराव ढोले, राजश्री बोरकर, मोहित ढमाले,अंकुश आमले ,जितेंद्र बिडवई यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, यावेळी उपस्थित होते . सामान्य जनतेच्या मनात विश्वास संपादन करण्यासाठी तसेच या सरकारला घालविण्यासाठी शेवटचा धक्का देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आले तर लोकप्रिय योजना बंद करणार असल्याचा अपप्रचार सत्ताधारी करत आहेत. एखाद्या मतदाराने चंद्र मागितल्यास तो देखील आणून देण्याचे आश्वासन सत्ताधारी देतील अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ,आमदारांना ५०कोटी रुपये देऊन महाराष्ट्रात आमदार खरेदी करण्यात आले ,इडी सिबीआयचा धाक दाखवुन पक्ष फोडण्यात आले असा आरोप यावेळी बोलताना केला. खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकारला कररूपाने सर्वात जास्त पैसा जातो परंतु अर्थसंकल्पात मात्र महाराष्ट्र संदर्भात दुजाभाव केला जातो, सत्ताधारी पक्षाचे खासदार केंद्राला यासाठी जाब विचारत नाही असा आरोप केला.,रोहिणी खडसे,मेहबूब शेख,भारती शेवाळे , सत्यशील शेरकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
(१) शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरी वरून लेण्याद्रीकडे जात असताना जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पास क्रेनमधून पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर क्रेन खाली येत असताना क्रेनचा पाळणा तिरका झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष मेहबूब शेख ,खासदार अमोल कोल्हे हे थोडक्यात अपघातातून बचावले.