सेवा सोसायटी राज्य कृती समितीच्या कार्याध्यक्ष पदी गणेश रेवगडे यांची एकमताने निवड

Share This News

बातमी 24तास(अकोले,प्रतिनिधी)

सहकाराचा पाया असणा-या ग्रामीण भागातील सेवा सोसायटी, महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या कार्याध्यक्ष पदी अकोले तालुक्याचे भुमीपुत्र तथा वीरगाव व कळस खुर्द सहकारी सोसायटीचे मुख्य सचिव गणेश रेवगडे यांची एकमताने निवड झाली आहे.

भारत सरकार मध्ये सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सेवा सोसायटी मार्फत शेतकरी बांधवांना सहकारा मार्फत विविध योजना व कर्जवाटपाचा नवीन कार्यपद्धती नाबार्ड मार्फत राबविण्याचे कामकाज प्रगतीपथावर चालू आहे.त्यामुळे संस्थेच्या सचिवांबाबत व संस्थेच्या कार्यासंबधी शासना सोबत वेळोवेळी समन्वय साधण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या मुख्य कार्याध्यक्ष पदी सचिवांच्या नेहमी प्रश्न सहकाराच्या दालनात मांडणारे तसेच स्वाभिमानी सचिव संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणेश रेवगडे यांची निवड झाली आहे. याबद्दल सर्व विभागांतुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy