
बातमी 24तास चाकण,( संजय बोथरा )देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत देशाचे स्थान उंचावण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार यांनी केले. शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सुनील तटकरे, दिगंबर दुर्गाडे, आमदार दिलीप मोहिते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे, रूपाली चाकणकर, राजेंद्र जवळेकर डॉ. राम गावडे, शांताराम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मतदार संघातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. आढळराव यांच्या उद्योग व्यवसायाची देश विदेशातील प्रगती पाहून विरोधकांनी त्यांच्या बदनामीचा कट रचला आहे असा आरोप पवार यांनी केला आपल्या भाषणात केला.

