पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO चा शिबीर दौऱा; खेड येथे १ व २ एप्रिलला आयोजन

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

पुणे, दि. २७: पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे १ व २ एप्रिल, मंचर येथे ८ व १० एप्रिल, जुन्नर येथे १५ व १६ एप्रिल, वडगाव मावळ येथे २२ व २३ एप्रिल तर लोणावळा येथे २९ व ३० एप्रिल या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy