बदली झालेल्या क्रीडा शिक्षकाच्या समर्थनार्थ चाकणकर एकवटले

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(कल्पेश अ. भोई ) राजकीय आकासाने बदली झालेल्या क्रीडा शिक्षकांच्या समर्थनार्थ चाकणच्या नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून शिवसेना (उबाठा) सह अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. खूप वर्षा पूर्वी जनता शिक्षण संस्थेत असेच एक आंदोलन झाल्याची चर्चा जेष्ठ नागरिकांत होती.

बा.ग.जगताप यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या जनता शिक्षण संस्थेचा विस्तार मोठा झाला आहे.नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत गुरुवर्य बा. ग.जगताप यांच्या नावाने असलेल्या पॅनलला एकतर्फी यश मिळाले, या राजकीय आखाड्यात विजयी झालेल्या पॅनल च्या विरोधात प्रचार केला म्हणून येथील श्री शिवाजी विद्यालयातील क्रीडा शिक्षक अण्णासाहेब कोडग यांची बदली करण्यात आली.असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सर्वसाधारणपणे मे, जून महिन्यात बदल्या होतात असे असताना डिसेंबरच्या अखेरीस ही बदली झाली याचे कारण गुलदस्त्यात आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी तीन-चार महिने कालावधी असताना ही बदली व्हावी,यामागे नक्कीच राजकारण आहे असा आरोप चाकणकर नागरिकांनी केला आहे.

कोडग यांची बदली स्थगित करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पांडुरंग गोरे शेखरनाना पिंगळे स्वामी कानपिळे ईश्वर राक्षे,तसेच सामाजिक कार्यकर्ते,चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन निलेश टिळेकर,नवनाथ शेवकरी,हिंदू संस्कार फाउंडेशन चे अजय जगनाडे, किशोर भुजबळ, जितेंद्र सोनवणे, राहुल कोरगावकर, सम्राट राऊत सामाजिक कार्यकर्ते सचिन पानसरे,दता जाधव, अक्षय शिवाजी जाधव, गणेश कदम, आल्ताफ काझी सचिन राऊत, किरण शेलार, गणेश जाधव, मुन्ना थोरपे सह इतर पदाधिका-यांनी निवेदना द्वारे केली आहे.

संस्थेतील अंतर्गत राजकारणाचा अनुभव वारंवार शिक्षक, पालक, विध्यार्थी यांना येत आहे.कोणत्याही शिक्षकाची बदली रोखण्यासाठी ही चाकण शहरातील अलीकडच्या काळातील पहिलीच घटना असून अण्णासाहेब कोडग हे चाकण प्रशालेतील एक शिस्त प्रिय शिक्षक, विध्यार्थीसह पालकांमध्ये ही आपली वेगळी छाप असलेले व्यक्तीमत्व आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अण्णासाहेब कोडग हे क्रीडा शिक्षक म्हणून सन 1994 पासून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात काम केले तदनंतर जनता शिक्षण संस्थेत 1997 साली चाकण येथील श्री शिवाजी प्रशालेत रुजू झाले.कोडग हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत असल्याने ते विद्यालयात एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना खेळाडू म्हणून राष्ट्रीय पातळी वर यश मिळविण्यात महत्वाचा वाटा आहे. मागील महिन्यात संस्थेचे झालेल्या निवडणुकीत त्यांनी फक्त संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवल्यामुळे त्यांची चाकण या ठिकाणाहून संस्थेच्या वडगाव निंबाळकर शाखेत बदली केलेली आहे. तसेच त्यांचा सेवा कार्यकाल सुमारे चार ते साडेचार वर्ष शिल्लक राहिला आहे. त्यातच त्यांच्यावरती हृदयशस्त्रक्रिया झालेली आहे.तसेच त्यांना बदली झालेल्या वडगांव निंबाळकर या ठिकाणी जायला रोजचा सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर व येण्यासाठी तेवढाच किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान या संदर्भात संस्थेच्या विद्यमान संचालकाशी संपर्क केला असता त्यांनी एकाद्या शिक्षकाची बदली होणे कार्यालयनी कामकाजाचा भाग आहे. या प्रकारणात राजकीय आकसाने बदली केल्याचा आरोप फेटाळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy