एक दिवस शाळेसाठी अपघात सायबर गुन्हा आणि महिला अत्याचाराबाबत केली जनजागृती
बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) दिघी आळंदी वाहतूक विभागाच्या वतीने पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बापू बांगर यांच्या संकल्पनेतून “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रम अंतर्गत राजमाता जिजाऊ कॉलेज, डुडुळगाव येथे अपघाताबाबत ,सायबर गुन्ह्याबाबत तसेच महिला अत्याचारांच्या गुन्ह्याबाबत पीपीटी दाखवून जनजागृती केली.
शालेय मुलींना महिला सक्षमीकरण बाबत जनजागृती करण्याची संकल्पना दिघी आळंदी पोलीस यांच्या वतीने राबवण्यात आली.यामध्ये महिला अत्याचाराबाबत घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारचे अपघात आणि सायबर गुन्हेगारी कशाप्रकारे वाढते आहे. आणि त्याबाबत दक्षता काय घ्यावेत. महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांनी विशेष दक्षता काय घ्यायला हवी. याबाबत विशेष जनजागृती करत मुलींना विशेष शिक्षण दिले गेले.सदर वेळी , वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनकर व महिला पोलीस शिपाई तापकीर मॅडम यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती सतीश नांदुरकर पोलीस निरीक्षक दिघी आळंदी वाहतूक विभाग यांच्याकडून देण्यात आलेली आहे.