स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन, आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात
बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल
(वृत्त सेवा ) ललित पाटील प्रकरणात रविंद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.ललित पाटील प्रकरणात अनेकांची चौकशी सुरु आहे.
आत्तापर्यंत 30 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे.मात्र, ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांना अद्याप अटक झाली नाही, त्यांना देखील अटक झाली पाहीजे. तसेच ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.
तुरुंगात असताना डॉक्टरांना ज्यांनी कोणी फोन केले, तसेच पाटील याला अटक केल्यानंतर पोलिसांना ज्यांनी फोन केले अशांची देखील सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली.
ललित पाटीलने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालवले. याबाबत आम्ही कारवाईची मागणी केली आहे. पोलीस, डॉक्टरांशी संगनमत ठेवून त्याने अवैद्य धंदा सुरू ठेवला. यात त्याने करोडो रुपयांचा व्यवहार केला.आम्ही आवाज उठवूनही संजीव ठाकूर यांना अटक केलेली नाही.
रविंद्र धंगेकर हे हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन परिधान करुन डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात दाखल झाले. त्यांनी विधानभवन परिसरात उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच त्यांच्या ॲप्रॉनवर ‘ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे’ असे लिहिले होते.