(प्रतिनिधी आरिफाई शेख) आळंदी येथे वेश्याव्यवसाय प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव दिनेश जराप्पा पुजारी (सध्या राहणार आळंदी) असे आहे.
केळगाव रोडवरील आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन महिलांची सुटका करणाऱ्या घटनेला काही कालावधी उलटलाही नाही तर आळंदीतील ही दुसरी घटना तीर्थक्षेत्र आळंदीच्या नावाला काळिंमा फासणारी आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष पथकाने मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 अन्वये वरील मरकळ रोडवरील आळंदी येथील मूनलाईट हॉटेल वर आळंदी पोलिसांकडून छापा मारण्यात आला सदर घटना मंगळवारी दिनांक 28 रोजी घडली. सदरील आरोपी दिनेश जरप्पा पुजारी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता अशी माहिती आळंदी पोलिसांकडून प्राप्त झालेली आहे. आळंदी पोलिसांनी तात्काळ छापेमारी करत मुनलाइट हॉटेलवर घडणाऱ्या या अपप्रकारास आळा घालण्यासाठी तात्काळ कारवाई केली. तीर्थक्षेत्र आळंदी म्हणून आळंदी चे पावित्र्य राखले जावे यासाठी केलेले प्रयत्न हे पुण्य कर्म आहेत आणि ते होत नसतील तर आपण त्या पापात सहभागी का? हा प्रश्न मोक्ष प्राप्तीसाठी नक्कीच विचारात घ्यायला हवा. केळगाव येथे दोन महिलांची वेश्याव्य प्रकरणी सुटका त्यानंतर आळंदीतील मरकळ रोडवरील मूनलाइट हॉटेल वरील छापा या गोष्टी आळंदीचे स्वास्थ बिघडवणाऱ्या आहेत. आळंदीचं आलेलं बकल पण वाढती लोकसंख्या यासाठी प्रशासकीय वर्गा असणे खूप महत्त्वाचे आहे अन्यथा ही जंगल राजची सुरुवात तर नाही ना ? का त्याची नांदी ? हा एक अनुत्तरित प्रश्न राहतो आहे. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये मरकळ रोडवरील मूनलाइट हॉटेल वरील आरोपी दिनेश जराप्पा पुजारी याचे विरोधात फिर्याद नोंदवली आहे. याबाबत आळंदी पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहे.