(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) आळंदी : वारंवार तक्रार करून ही तसेच इंद्रायणीचे पावित्र्य याकडे दुर्लक्ष करत होणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रचंड प्रदूषणाबाबत खेड तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांची पत्रकारांसोबत चर्चा विनिमय बैठक पार पडली. यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी आळंदीच्या प्रशासकीय कारभारावरही ताशेरे ओढले. कार्तिक वारी आणि माऊलींच्या समाधी सोहळा निमित्त भाविकांची मोठी गर्दी आळंदीत भरणार आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीवर हिमनदीसारखे प्रदूषित करणारे घातक रासायनिक पदार्थामुळे तयार झालेले फेस यांनी इंद्रायणी नदी व्यापली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकारांचे बैठकीमध्ये सांगितले की वडिवळे धरणातून कार्तिकी वारीसाठी पाणी सोडले जाईल त्याचबरोबर चाकण येथील पाच लाख घरांचा आणि खेड येथील एक लाख घरे यांचे प्रदूषित पाणी हे नदीमध्ये सोडले जाते जी व्यथा आळंदीच्या नदीची आहे तीच व्यथा खेळ आणि चाकांच्या ठिकाणी दिसून येते यासाठी योग्य ते उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न मार्फत आळंदी इंद्रायणी प्रदूषण बाबत लक्षवेधी मांडली होती. परंतु तरीही इंद्रायणी नदीचे लचके तोडणारे राक्षस मात्र प्रदूषणाबाबत कशाची भीती बाळगत नाहीत. परिणाम मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदी फेसळली आहे. आमदार मोहिते पाटील यांनी पीएमआरडी बाबतही मोठे विधान केले पीएमआरडी मध्ये कुरण झाले आहे कोणाचा पायपस कोणात नाही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि बेकायदेशीर कारभार पीएमआरडी मार्फत केला जात आहे तसेच आळंदी नगर परिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे विकास आणि निर्णय प्रक्रिया हीच अडचण आहे प्रशासकीय प्रशासनाला मर्यादित अधिकार आहेत त्यामुळे योग्य असे निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले इंद्रायणीच्या प्रदूषणाची पातळी पाहता कार्तिक वारीसाठी वडिवडे धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल इंद्राणी सोबत भिमा भामा नदीची ही दुरावस्था आहे दूरगामी उपाययोजना करून एसटीपी प्रकल्प प्रत्येक ठिकाणी हवा अन्यथा ब्रह्मदेवाचा… आला तरीही नदी प्रदूषण थांबणार नाही असे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आळंदीच्या समस्या बाबत पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.