बातमी24तास Web News Poratl(पुणे क्राईम रिपोर्ट)
ज्या वयात मुलं आयुष्याचे नव्या पर्वाची सुरुवात करत असतात, त्याच वयात पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राज गर्जे असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. राजचा मित्र निरूपम जोशी याच्यावर राजला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज आणि निरूपम जोशी यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास त्रास देत होता. वेळोवेळी होणार्या त्रासाला कंटाळून राजने मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केली.
अत्यंत गरीब घरातून आलेल्या राजच्या घरावर या प्रकराने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.माझा भाऊ असे टोकाचे पाऊल का उचलेल हेच आम्हाला समजत नसून हा मोठा धक्का आम्ही पचवू शकत नाही, अशी खंत राजच्या भावाने व्यक्त केली आहे. दरम्यान,दुसऱ्या बाजूला आम्हाला मिळालेल्या स्टेटमेंट वरून हा रॅगिंगचा प्रकार दिसत नाही मात्र आम्ही त्या अनुषंगाने देखील या संपूर्ण घटनेचा तपास करत आहोत असे चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.