
एक तारीख एक तास या अभिनव उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद!.
बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल (राजगुरूनगर प्रतिनिधी)खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत महात्मा गांधींच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राजगुरूनगर(ता:खेड) येथील बस स्थानक परिसरात एक तारीख एक तास या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे 93 स्वयंसेवक या अभियानात सहभागी झाले होते. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. अभियानाची सुरुवात स्वच्छते विषयी शपथ घेऊन करण्यात आली. प्राध्यापक पी.एन. गदादे यांनी शपथेचे वाचन केले.यानंतर स्वच्छतेविषयीची जनजागृती रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली.
