(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) केंद्र आणि राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी “आयुष्मान भव” मोहीमे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे भव्य आरोग्य मेळावा आज आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याचे उद्घाटन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पांडुरंग गावडे,उद्योजक राहुल चव्हाण,संकेत वाघमारे ,अप्पर जिल्हाधिकारी तथा सहसंचालक( तांत्रिक ) बोरावके सर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ,एन. एच. एम. समन्वयक गणेश जगताप यांच्या उपस्थितीत पार पडले .
वरील मेळाव्यात तज्ञ डॉक्टर स्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ,अस्थी रोग तज्ञ,शल्य चिकीत्सक, नाक कान घसा तज्ञ,नेत्र रोग तज्ञ,दंत चिकित्सक इ सेवांच्या तज्ञ डॉक्टर्सनी उपस्थित राहून सेवा दिल्या.मेळाव्यामध्ये एकूण 948 रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले तसेच “निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे” या संकल्पने अंतर्गत 252 18+ पुरुषांची तपासणी आणि उपचार करण्यात आले.,पैकी सहा रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली.याशिवाय सर्व मान्यवरांच्या उपस्थित अवयव दान शपथ घेण्यात आली आणि अवयव दान करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या एकूण 20 अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वेच्छेने ऑनलाईन फॉर्म भरले.वरील मेळावा उपसंचालक डॉ राधाकिशन पवार सर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला.