महामार्गांवरील अतिक्रमणे काढून घेण्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आवाहन

Share This News

बातमी24तास, (वृत्त सेवा)

पुणे- सोलापूर, पुणे- नाशिक, खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक), पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम तीन दिवसाच्या आत काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.

पुणे सोलापूर क्र. ६५ वरील हडपसर ते हिंगणगाव (इंदापूर) पुणे नाशिक क्र. ६० वरील नाशिक फाटा ते चांडोली तसेच खेड (राजगुरुनगर) ते सिन्नर (नाशिक) क्र. ५४८ डी वरील तळेगाव-चाकण-शिकापूर, पुणे सातारा क्र. ४८ वरील देहूरोड (पुणे) ते शेंद्रे (सातारा) व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र. ९६५ वरील हडपसर ते दिवेघाट हद्दीत मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

अतिक्रमण काढण्याबाबत प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाही.त्यामुळे या हद्दीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूस केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy