शिक्षणाकामी मिळाला मोका आरोपीस दोषारोपपत्र दाखल होण्याआधी जामीन.

Share This News

बातमी 24तास (पुणे, प्रतिनिधी )

शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणाकामी मोका आरोपीस दोषारोपपत्र दाखल होण्याआधी जामीन मिळाला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,चंदन नगर पोलीस ठाणे येथील गु. र. क्र ५९१/२३, हा गुन्हा भा. द.वी कलम ३०७ प्रमाणे नोंदविण्यात आला होता व त्यात पुढे मोक्याची कारवाई करण्यात आल्यामुळे सदर खटल्याचे कामकाज हे विशेष मोका न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्या कोर्टात चालवण्यात आले. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे म्हणणे की मित्राचे भांडण सोडवायला गेले असता आनंद पार्क वडगाव शेरी या परिसरात त्यांच्यावर कोयत्याने मारहाण व दगडफेक करण्यात आली होती. आणि त्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यात आली होती.

सदर घटनेची व्हिडिओ क्लिप ही वायरल झाली होती. सदर खटल्यात आरोपी अक्षय ताकपरे याने जामीन अर्ज ठेवून त्याचा गुन्ह्याशी संबंध नसून व मोका कायद्यातील तरतुदी त्याला लागू होत नसल्याचे आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युक्तिवाद करण्यात आला होता, त्याच्या विरोध करत सरकार पक्षाने सदर गुन्ह्याची व्हिडिओ फुटेज असून, सह आरोपी कडून कोयता जप्त करण्यात आल आहे, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद करत जामीन अर्जास आक्षेप नोंदविला होता.

विशेष मोका न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी आरोपी अक्षय ताकपेरे याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि त्याच्यावर लावलेले आरोप हे कलम ३०७ याच्या कक्षेत बसणारे नसून त्याच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज मंजूर केला. तदनंतर आरोपी अमोल चोरगडे, राहुल बरवसा आणि हरिकेश चवान यांनी जामीन अर्ज सादर केले असता त्यांचा देखील वरील आरोपी सारखाच रोल असल्याकारणाने त्यांना ही जामीन देण्यात आला. वरील सर्व आरोपींच्या वतीने युक्तिवाद एडवोकेट सुशांत तायडे यांनी केला आणि प्रज्ञा कांबळे- तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी कामकाज पाहिले.

अक्षत ताकपेरे याचे वडील हयात नसून त्याचे मामा त्याचा सांभाळ करीत त्याचे शिक्षणाचे बघत होते आणि त्याला तो शिक्षण घेत असलेले ठिकाणी डिप्लोमा इन टूल इंजिनिअरिंग मध्ये ९०% हजेरी अट होती, अश्या आरोपींवर मोक्या सारखी कडक कार्यवाही करण्याआधी शासनाने विचार करायला हवा, फक्त गुन्हेगारी वर आवर घालणं गरजेचे नाही, त्यामुळे योग्य आणि सुशिक्षित मुलांचे नुकसान तर होत नाही या कडे ही लक्ष द्यायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy