भाजपा चाकण शहर महिला मोर्चा शहराध्यक्षापदी अरुणा पगारे

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी,अभिजित सोनवळे) चाकण (एकतानगर) येथील अरुणा रमेश पगारे यांची भारतीय जनता पार्टी, चाकण शहर महिला मोर्चा- शहराध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे .आपले सामाजिक क्षेत्रातील कार्य व संपर्क पहाता आपली भारतीय जनता पार्टीचे संघटन कार्य वाढीसाठी निवड करण्यात आली आहे.

आपल्या अनुभवाची मदत पक्षवाढीसाठी होईल या अपेक्षेने आपली निवड करण्यात येत आहे.असे तालुकाध्यक्ष कल्पना गवारी यांनी बोलताना सांगितले. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष कल्पना गवारी यांच्या हस्ते पगारे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राजनभाई परदेशी, मनोज मांजरे,अमृत नाना शेवकरी, अजय जगनाडे, दत्ता परदेशी,अर्जुन बोराडे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मालिनी शिंदे,महिला मोर्चा चाकण शहर सरचिटणीस मेघा ठाकर , महिला मोर्चा चाकण शहर सरला बोरशे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy