डी. वाय. पाटील स्कूल मध्ये मुलींच्‍या स्‍वच्‍छतागृहात लावले ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ प्राचार्याला चोप

Share This News

बातमी 24तास

(क्राईम रिपोर्ट ) मावळ तालुक्‍यातील तळेगाव जवळील अंबी गावातील ‘डी.वाय. पाटील स्‍कूल’मध्‍ये मुलींच्‍या स्‍वच्‍छतागृहात शालेय प्रशासनाने ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ लावले असल्‍याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यातच शाळेतील विद्यार्थ्‍यांकडून ख्रिस्‍ती धर्माची प्रार्थनाही वदवून घेतली जायची, या दोन्ही घटना बजरंग दल आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांना कळताच त्‍यांनी या शाळेच्‍या प्राचार्यांना जाब विचारला. मात्र त्‍यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्‍याने त्‍यांनी ४ जुलै या दिवशी प्राचार्यांना मारहाण केली. ‘अलेक्‍झांडर कोट्‍स’ असे या वादग्रस्त प्राचार्यांचे नाव आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी या शाळेच्‍या प्राचार्यांवर विद्यार्थ्‍यांना बलपूर्वक ख्रिस्‍ती धर्माची शिकवण देण्‍याचा आरोप केला आहे. इतर शिक्षकांच्‍या साहाय्‍याने ते हा प्रकार करत होते. या प्रकरणी तक्रार प्राप्‍त झाली आहे; पण या प्रकरणी अद्याप गुन्‍हा नोंद करण्‍यात आला नाही.प्रशालेने प्राचार्यांना सक्‍तीच्‍या रजेवर पाठविण्‍यात आले असल्याचे समजते . कॅमेर्‍याच्‍या संदर्भातील प्रकार शाळेतील मुलींनी त्‍यांच्‍या पालकांना सांगितला. त्‍यावर पालकांनी शालेय प्रशासनाला जाब विचारला. त्‍या वेळी प्राचार्यांनी हे कॅमेरे लावण्‍याच्‍या सूचना दिल्‍याचे सांगण्‍यात आले. त्‍यामुळे दोषींवर कठोर कारवाई करेपर्यंत शाळा बंद ठेवण्‍याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. शालेय प्रशासनाने या प्रकरणी मौन बाळगले आहे. त्यामुळे लेडीज टॉयलेट मध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसवण्यात आले होते हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे मावळ यांनी तहसीलदार आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy