बातमी 24तास
(जुन्नर /आनंद कांबळे )दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान,उर्मी संस्था व ॲफिनिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने इनामवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या, चित्रकला ,रंगपेटी व कंपासपेटी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. मुलांना हे साहित्य मिळाल्याने त्यांना अत्यानंद झाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरच काही शिकून गेला मुळातच अत्यंत गरीब परिस्थिती मधून आलेल्या या मुलांना खरंतर शैक्षणिक साहित्याची खूप मोठी गरज असते .मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना मुलांसाठी हे साहित्य घेणे शक्य नसते अशा परिस्थितीमध्ये दुर्ग संवर्धन प्रतिष्ठाण व त्यांच्या सहयोगी संस्थानी केलेली मदत ही खरोखरच या मुलांच्या शिक्षण प्रक्रियेला हातभार लावणारी ठरणार आहे असे मत शाळेच्या शिक्षकवृंदांनी व्यक्त केले. ही मदत मिळवून देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील माननीय संजय डुंबरे सर (सल्लागार,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ)यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…