आंबेडकरी कार्यकर्ते अक्षय भालेराव यांच्या हत्या प्रकरणी आरोपीना कडक शासन होऊन न्याय मिळावा मागणीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
बातमी 24तास WebNewsPortal
नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात आंबेडकरी कार्यकर्ते अक्षय भालेराव यांनी गावात डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढली व जयंती साजरी केली म्हणून गावतीलच जातीवादी समाजकंठकांनी त्याची निघृण हत्या केली आहे. हि बाब अत्यंत संतापजनक असून स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर सुद्धा जातीवाद अजून मिटलेला नाही, हेच गृहीत धरावे लागत आहे. आंबेडकरी कार्यकर्ते अक्षय भालेराव यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष – रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री भारत सरकार) यांचे आदेशाने सूर्यकांत वाघमारे (अध्यक्ष – पश्चिम महाराष्ट्र राज्य) यांचे नेतृत्वा खाली विक्रम दादा शेलार (अध्यक्ष- पुणे जिल्हा) यांचे मार्गदर्शनाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुका वतीने तहसीलदार वैशाली वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका अध्यक्ष दिलीप नाईकनवरे ,कार्याध्यक्ष कामगार आघाडी महा. राज्य अनिल मोरे, युवक अध्यक्ष किरण गोतारणे, चाकण शहर अध्यक्ष महिला आघाडी लक्ष्मी ताई पवार, वाहतूक आघाडी अध्यक्ष अभिमान दिसले व सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.