(प्रतिनिधी,सचिन आल्हाट) चाकण येथील किल्ले संग्राम दुर्ग येथे दिनांक 24-4-2024 ते 30-4-2024 रोजी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने शौर्यभूमी श्री संग्राम दुर्ग चेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये चाकण व परिसरातील मुला-मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शिबिर अगदी मोफत स्वरूपात आयोजित केले होते. योगासने, प्राणायाम, देह विज्ञान या बरोबरच सामूहिक खेळांची माहिती देण्यात आली. तसेच मुलांना व्यायाम व मैदानी खेळांची माहिती विशिष्ट प्रशिक्षकांच्या माध्यमातून ही देण्यात आली.