बातमी 24तास (प्रतिनिधी) चाकण येथील अभय अरुणशेठ वाडेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन गोळे यांच्या हस्ते चाकण येथील अभय अरुणशेठ वाडेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र अमित ठाकरे यांनी दिले. यावेळेस पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर लोकसभेचे संघटक तसेच पुणे जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष समीर थिगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे सरदार , महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत पाटील यावेळी उपस्थित होते.