साताऱ्याहून मुलीला भेटायला आली आणि.. आईची दगडाने ठेचून हत्या; पुण्यात खळबळ

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(क्राईम रिपोर्ट )

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात थोपटेवाडी येथे एका ५० वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. थोपटेवाडी परिसरातील पाझर तलावाच्या शेजारी महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. संगीता शरद करे (वय ५०) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या संदर्भात महिलेच्या जावयाने जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, थोपटेवाडी परिसरातील पाझर तलावा शेजारी एका महिलेचा दगडाने ठेचला असलेला मृतदेह आढळला आहे. ही बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे.

या महिलेची ओळख पटवताना पोलिसांना माहिती मिळाली की, मृत महिला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कापडगाव येथील आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

मृत महिलेच्या मुलीचा पिसुर्टी येथील गोपीनाथ जगन्नाथ बरकडे यांच्याशी विवाह झाला आहे. त्यामुळे मुलीला भेटण्यासाठी त्या अनेक वेळा पिसुर्टी येथे यायच्या. यावेळी देखील त्या आपल्या मुलीला भेटायला आल्या होत्या. मात्र, त्यांचा कोणीतरी अज्ञाताने त्यांचा दगडाने ठेचून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. थोपटेवाडी येथील पाझर तलावाच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला दोन मोठे दगड पडलेले असून त्याला रक्त लागलेलं होते. त्यामुळे दगडाने ठेचून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मृत महिलेचा जावई गोपीनाथ बारकडे यांनी याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी त्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy