धाराशिव : आज धाराशिव येथे झालेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनात खेड तालुक्याचा मल्ल पै. शिवराज राक्षे याने 63 वा महाराष्ट्र केसरी पै हर्षद सदगीर याच्यावर गुणांनी मात करत महाराष्ट्र केसरी चा बहुमान दुसऱ्यांदा पटकावला आहे. पै शिवराज राक्षे याला कुस्तीचे बाळकडू त्याचे वडील पै काळूराम राक्षे यांच्याकडून मिळाले आहे. त्याने कुस्तीची सुरुवात आळंदी येथील जोग महाराज कुस्ती केंद्र येथे केली असून तो सद्य स्थितीत अर्जुन विर पुरस्कार विजेते पै काका पवार यांच्या मार्गदर्शना खाली पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे कुस्तीचा सराव करत आहे. शिवराज ने संपादन केलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक सर्व स्तरांवरुन होत आहे.