बातमी 24तास Digital News (क्राईम रिपोर्टर) तू मला आवडतेस माझ्या बरोबर चल असे म्हणत एका २२ वर्षीय तरूणीचा हात धरत तिला ओढत नेत लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना आज शनिवार सकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती मध्ये घडली आहे. याबाबत बारामती शहर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.अरफाज सादिक आत्तार (रा. कोष्टी गल्ली, बारामती) असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आज शनिवारी सकाळी आरोपी अरफाज हा फिर्यादी तरुणीचा पाठलाग करीत होता. यावेळी बंगल्याचे दरवाजा जवळ जाऊन फिर्यादीस बाहेर बोलावून घेऊन, ‘तू मला आवडतेस माझ्याबरोबर चल’, असे म्हणून तिचा डावा हात पकडून हात ओढून बंगल्याच्या गेटच्या बाहेर फरपटत नेऊन माझ्याशी लग्न कर असे म्हणून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच सदर तरुणीला ढकलून दिल्याने तिच्या गुडघ्याला जबर जखम झाली आहे. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद सदर तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात अराफाज आत्तार याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.